परंडा (प्रतिनिधी) - येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय भव्य चित्रकला निबंध व वक्तृत्व स्पर्धा महाविद्यालयात गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनिल जाधव व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते रा गे  शिंदे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन राऊत, विस्तार अधिकारी विकास सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ महेश कुमार माने व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे आदी उपस्थित होते. पाऊस पाणी संकलन पाणी आडवा पाणी जिरवा जल हेच जीवन माझ्या गावातील पाणी पुरवठा पाण्याचे स्त्रोत बळकरीकरण जलसंवर्धन व पाण्याचे सुयोग्य वितरण व देखभाल दुरुस्ती इत्यादी विषय  या स्पर्धेसाठी दिले होते.सदर स्पर्धेसाठी कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालय स्तर बक्षीस रक्कम अनुक्रमे प्रथम क्रमांक 21000 रुपये द्वितीय क्रमांक 11000 रुपये तर तृतीय क्रमांक 5500 रुपये ठेवण्यात आले होते. या तालुकास्तरीय स्पर्धेमधून जिल्हास्तरीय स्पर्धेत ज्या विद्यार्थ्याची निवड  झाली आहे त्यांना प्रमाणपत्र ट्रॉफी बुके व बक्षीस रक्कम देऊन सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करून देण्यात येईल असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, बावची विद्यालय परंडा, संत मीरा पब्लिक स्कूल परंडा, न्यू हायस्कूल अनाळा, जिल्हा परिषद प्रशाला परंडा, जिल्हा परिषद उर्दू प्रशाला परंडा, जिल्हा परिषद प्रशाला जवळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगाव (खुर्द ), वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय परंडा , जिल्हा परिषद मुलांची प्रशाला परंडा, जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला परंडा, जिल्हा परिषद मुलींची प्रशाला परंडा इत्यादी शाळा महाविद्यालयांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. 

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कनिष्ठ विभागातून प्रा संभाजी धनवे, प्रा तानाजी फरतडे व विकास वाघमारे तर वरिष्ठ विभागातून प्रा डॉ शहाजी चंदनशिवे , प्रा डॉ कृष्णा परभणे यांनी परीक्षण केले. यावेळीअनेक शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बावची विद्यालयाचे सहशिक्षक विकास वाघमारे रोकडे  संत मीरा पब्लिक स्कूलचे शिक्षक सुरवसे जिल्हा परिषद उर्दू प्रशालेच्या सहशिक्षिका अंजली चंदनशिवे व  जमील बांगी अनाळा जिल्हा परिषदेचे जगदाळे सूर्यकांत जिल्हा परिषद देवगाव येथील सहशिक्षक शिंदे आदी शिक्षक यावेळी उपस्थित होते. 

परीक्षकांच्या परीक्षणानंतर वक्तृत्व स्पर्धेमध्ये कनिष्ठ विभागातून रिया रणजीत शिंदे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकाविला . तर कुमारी सृष्टी दत्तात्रय गोपने यांनी द्वितीय तर सय्यद शहाजहान इमरान या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकाविला .वरिष्ठ गटातून शुभम फरतडे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पाठविला तर प्रत्यक्षा शिवाजी लिमकर या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक पटकाविला या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन सांस्कृतिक विभाग डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन राऊत यांनी केले अध्यक्ष समारोप प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी केला तर कार्यक्रमाचे आभार प्रा तानाजी फडतरे यांनी मांनले.


 
Top