उमरगा (प्रतिनिधी)- माणसांनी काया वाचा मनाची शुद्धी करून कुशल कर्म करावे. कुशल कर्माचा संचय करून आपापसात सुसंवाद निर्माण करा. दोन माणसातील उचित संवाद म्हणजे धम्म आहे. एकमेकांना प्रेमाने जयभीम करा एकमेकांचें कुशल गोष्टींचें चिंतन करा तेंव्हाच धम्माची निर्मिती होते.शिलाचे पालन केल्याने नवं समाजाची निर्मिती होते. पंचशीलाचें नियमित पालन करून आपले जीवन समृद्ध करावे असे प्रतिपादन भन्ते सुमंगल यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील दाळिंब भीमनगर येथील बोधिसत्व बौद्ध विहाराचा तिसरा वर्धापन दिन मंगळवारी (दि.27) साजरा करण्यात आला या वेळी ते बोलत होते.

या वेळी विहार ट्रस्टचें अध्यक्ष संदीपान सुरवसे,सचिव अभिमन्यू गायकवाड, यांची उपस्थिती होती.प्रारंभी भगवान बुद्धाच्या प्रतिमेचे पूजन रजनीताई अभिमन्यू गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली.

पुढे बोलताना भन्ते सुमंगल म्हणाले की, प्रत्येक माणसांनी विहारात येऊन ध्यान करावे स्वास येतो जातो त्यावर नियंत्रण मिळवा धम्माचें चिंतन करून धम्म आत्मसात करा मनाला परिशुद्ध करण्यासाठी ध्यान आवश्यक आहे. आपण शारीरिक आजार झाल्यास लाखो रुपये खर्च करून ईलाज करतो पण मनाचे काय असा सवाल त्यानीं केला. आजपर्यंत आपण काय केले हे पहाण्याचा हा दिवस आहे.मी किती माणसाला दुखावलं हे मनाला विचारावं आणि किती लोकांचें चांगले केले.हे मनालाच विचारून आपले आचरण सुधारावे असे ते म्हणाले.या वेळी आनंद कांबळे,अभिमन्यू गायकवाड, सुधाकर गायकवाड,यांची भाषणे झाली.

बोधिसत्व बौद्ध विहार ट्रस्टचें अध्यक्ष संदीपान सुरवसे,दिलीप गायकवाड,गुलाब गायकवाड,मारुती कांबळे, खंडेराव सुरवसे,उबर गायकवाड, मधुकर सुरवसे, नवनाथ गायकवाड, कुणाला गायकवाड, अंजनाबाई सुरवसे, गोळाप्पा कांबळे, दिलीप गायकवाड, चंद्रकात गायकवाड,औसाबाई गायकवाड आदींनी कार्यक्रमास पुढाकार घेतला होता विश्वंभर गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. सुधाकर गायकवाड यांनी आभार मानले.


 
Top