धाराशिव (प्रतिनिधी)-श्री.श्री. रविशंकर आर्ट ऑफ लिव्हिंग अंतराष्ट्रीय केंद्र बंगळूरू येथे संस्कृतिक मंत्रालय भारत सरकार संस्कार भारती अखिल भारतीय कलासाधक संगम 1 ते 4 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न झाले. उद्घाटन समारंभदिनी म्हैसूर राजघराण्याचे महाराजा यडूरवीर कृष्णदत्ता चामराजा वडियार, विजय नगर साम्राज्याचे कृष्ण देवराया पद्मश्री मन्जंम्मा जोगती,डॉ. विक्रम संपत , एसएनए विजेते तबला वादक पंडित रवींद्र यावगल, सं.भा. राष्ट्रीय अध्यक्ष वासुदेव कामत कर्नाटक प्रांत अध्यक्ष के. सुचिन्द्रां प्रसाद यांचे हस्ते महामंत्री सतिश कुलकर्णी यांचे मार्गदर्शनातील सामाजिक समरसता विषयी सौहार्द समृद्ध सद्भाव चित्रशाळा राष्ट्रीयस्तरीय रवी देव व सुरजकुमार यांचे मार्गदर्शनात देशभरातील संस्कार भारतीचे कलासाधकांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. 

त्यानंतर उपस्थित मणीपूर म्युझोरम ,राजस्थान, छत्तीसगढ,गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आदि सर्व राज्यातील कला साधकांनी आपल्या राज्याच्या लोककला, बिहु आदि नृत्य सादरीकरण केले. 2 फेब्रुवारी रोजी समारंभ सुरुवात देवगिरी प्रांत नांदेड समिती संस्कार भारती देह गीतीने सुरुवात करण्यात आली. पद्मश्री योगेंद्र बाबा व सं.भा. राष्ट्रीय माजी महामंत्री स्व. अमीरचंद ,सामाजिक समरसता बोध कथाएँ पुस्तकाचे विमोचनासह  आदिती पासवान यांचे व्याख्यान व रेश्मा प्रसाद तृतीय पंथीयांच्या सामाजिकदृष्ट्या स्तरावर भाष्य करण्यात आले व उर्वरित सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. 3 फेब्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसंघचालक मोहन भागवत , वासुदेव कामत यांचे शुभहस्ते भरतमुनी सन्मान बाहुली कलाकार गणपत मसगे सिंधूदुर्ग, चित्रकार विजय आचरेकर मुंबई यांचा रोख रक्कम धानदेश सन्मान चिन्ह गौरव पत्र देऊन गौरविण्यात आले . महाभारत फेम श्री कृष्णाची भुमिका साकारणारे नितीश भारद्वाज यांनी' कृष्ण कहें ' प्रमोद पवार दिग्दर्शित सामाजिक समरसता विषयावर नाटिका सादर केली . विविध राज्याच्या संस्कृतीनुसार नाटिका ,नृत्ये,वारकरी , विविध गुणदर्शनाचे  मोहन भागवत यांचे समक्ष सादरणीकरण करण्यात आले. 4 फेब्रुवारी शोभा यात्रेचे आयोजन केले होते. देशभरातून आलेल्या 2000 हून अधिक कलासाधकांनी आप आपल्या राज्याच्या संस्कृतीचे वेशभुषेतून प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्रातून 'वारकरी दिंडी ' पश्चिम प्रांत क्षेत्रप्रमुख चंद्रकांत घरोटे , देवगिरी प्रांत कार्याध्यक्ष भगवान देशमुख, महामंत्री जगदीश देशमुख, जयंत शेवतेकर, लोककला विधाप्रमुख डॉ. सतिश महामुनी यांच्या मार्गदर्शनानुसार शोभायात्रेत सहभागी होते. समारोप समारंभात राष्ट्रीय अध्यक्ष वासुदेव कामत, उपाध्यक्ष नितीश भारद्वाज, आदि मान्यवरांच्या हस्ते जाहिर पद्मविभुषण राजदत्त, कश्मीरचे पद्मश्री रोमालू राम जी, श्रीरामाची मुर्ती रेखाकार, मुर्तीकार अरुण योगीराज यांचा सत्कार करण्यात आला. सरसंघचालक मोहन भागवत व श्री श्री रविशंकर यांनी उपस्थित देशभरातील संस्कार भारती पदाधिकारी कलासाधकांना मार्गदर्शन केले. दोघांनीही आपली संस्कृती परंपरा कला जतन करावी कला मानव जीवन व समाज समृद्ध करते असे भाष्य केले. या 4 दिवशीय संस्कार भारती अखिल भारतीय कलासाधक संगम 2024 मान्यवरांना श्री तुळजाभवानीची कवड्याची माळ देवगिरी प्रांत सं.भा. धाराशिव जिल्हा समीतीच्या वतीने पदाधिकाऱ्या हस्ते परिधान करण्यात आली.राष्ट्रीय रांगोळी प्रमुख रघुराज देशपांडे यांच्या मार्गदर्शनात सामाजिक समरसता मधील रांगोळी प्रदर्शात देवगिरी प्रांतातील संतोष पाठक सह अन्य कलावंतांनी रांगोळी रेखाटली राष्ट्रीय चित्रकला प्रमुख रवी देव व सुरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावरील चित्रकला प्रदर्शनीत देवगिरी प्रांतातील केदार नाईक धुळे, अनील पाटील जळगाव, सौ.मृणाल कुलकर्णी लातूर प्रांत चित्रकला विधा प्रमुख शेषनाथ वाघ यांचे मार्गदर्शनात निवड होऊन चित्रे प्रदर्शित करण्यात आली. कलासाधक संगामासाठी प्रांतातील 40 पदाधिकारी कलासाधकासह मातृशक्ती प्रमुख स्नेहल पाठक, नाट्यविधा सुनिता घाटे, कोषप्रमुख मोहन रावतोळे, सहकोष प्रमुख अभय ृंगारपूरे, भु अलंकरण प्रमुख सौ. गीता रावतोळे , संजय घायाळ, डॉ. देवेंद्र कुलकर्णी, धनंजय देशपांडे , प्रमोद देशपांडे, धनंजय गुडसुरकर,अजय कासोदेकर,लोक कलावंत शेखर भाकरे, दत्त प्रसाद गोस्वामी, शर्वरी सकळकळे, सौ.अंजली देशमुख, प्रमोद वझे, सौ. वैशाली कुलकर्णी गोस्वामी, जयंत वाकोडकर, धाराशिव जिल्हा समितीचे जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, उपाध्यक्ष पदमाकर मोकाशे, जिल्हा संगीत विधाप्रमुख सुरेश वाघमारे, सुंभेकर मार्गदर्शक शेषनाथ वाघ आदि मान्यगण उपस्थित होते. या कलासाधक संगामात जणू छोटा भारत आहे चित्र निर्माण झाले होते.


 
Top