भूम (प्रतिनिधी)-तालुक्यातील माणकेश्वर येथील गावालगतच्या खासबागेतील गट नंबर 536/564 या गटातील विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागून ऊस जळून खाक झाला आहे. दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी ही घटना सकाळी 9.00 वाजताच्या दरम्यान घडली. 

येथील शेतकरी महादेव कळसुले यांच्या शेतातील ऊसास आग लागून शेजारील शेतकरी चंद्रभान अंधारे, दत्ता सांगडे, हनुमंत सांगडे, महावीर जैन, राजेंद्र जगदाळे, तानाजी सांगडे, पांडुरंग अंधारे यांच्या शेतातील उसास आग लागून ऊस जळून खाक झाला आहे. सर्व शेतकरी परिसरातील कारखानाचे सभासद असून वारंवार पाठपुरावा करून सुद्धा अपुरी तोकडी यंत्रणा असल्याने त्यातच ही घटना घडल्याने परिसरातील शेतकरी वर्गातून हळहळ व्यक्त होत आहे.


गेल्या दोन महिन्यापासून कारखान्याकडे आम्ही सर्व शेतकरी हेलपाटा मारत आहोत. परंतु कारखान्याकडून कसलाच प्रतिसाद आम्हाला मिळत नाही. माणकेश्वर गावातील सहा शेतकऱ्यांचा ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाला. तरी राहिलेला ऊस कारखाने नेऊन आम्हाला चालू दराप्रमाणे भाव द्यावा.

राहुल अंधारे, शेतकरी माणकेश्वर


 
Top