उमरगा (प्रतिनिधी)-तालुक्यातील नाईक नगर येथे श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित युवकांचा ध्यास ग्रामविकास व बालविवाह जनजागृती ' या शीर्षकाखाली वार्षिक विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.9) उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रचना राठोड होत्या. यावेळी विठ्ठलसाई कारखान्याचे संचालक माणिकराव राठोड, उमरगा-लोहारा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेश राठोड, माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव, माजी सभापती मदन पाटील, माजी उपसभापती गोविंद पाटील, दत्ता चटगे, सरपंच रितेश जाधव, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव महालिंग बाबशेट्टी, सुजित शेळके, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, प्राचार्य रमेश जाधव, मुख्याध्यापक गोविंद चव्हाण, उपसरपंच वालचंद राठोड, ग्रामपंचायत सदस्य अरुण राठोड, अशोक राठोड, ग्रामसेवक सचिन डावरे, मार्केट कमिटीचे संचालक सोनकटाळे, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार आदिंची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. शिला स्वामी, डॉ. रविंद्र आळंगे, डॉ. महेश मोटे, डॉ. राम बजगिरे, डॉ. प्रकाश कुलकर्णी, डॉ. विलास खडके, डॉ. नागोराव बोईनवाड, डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. अजिंक्य राठोड, विद्यार्थी प्रतिनिधी ओमकार चव्हाण, मनोज हावळे, अमोल कटके, श्रावण कोकणे आदिंनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अशोक बावगे यांनी, सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी आभार मानले. यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थीनी, ग्रामस्थ उपस्थित होते.    


 
Top