कळंब (प्रतिनिधी)- महापुरुषांनी मानव कल्याणासाठी   माणसाला माणूस म्हणून वागणूक व ओळख मिळावी व  समतावादी विचार रुजविण्याचे  महान कार्य केले आहे अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी पणतीला पणती लावावी. यामुळे समाजात सुख, शांती एकोपा नांदेल असे विचार पुणे येथील प्रसिद्ध व्याख्याते प्रा. धनंजय झोंबाडे यांनी शिव सेवा तालीम संघ आयोजित शिवजयंती उत्सव समिती व्याख्यानमालेतील शिवराय ते भीमराव  या विषयावर (14 फेब्रुवारी ) रोजी अहिल्याबाई होळकर चौक येथे आयोजित व्याख्यानमालेत बोलत असताना व्यक्त केले.

त्यांनी आपल्या व्याख्यानात शिवराय ते भिमराव सांगत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या मनुवादी विचाराच्या लोकांनी अडचणी आणल्या विरोध केला ती मनुस्मृती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दहन केली असे सांगितले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील  समाधी शोधून काढली व पहिली शिवजयंती साजरी केली. तर राजर्षि शाहू महाराज यांनी आपल्या राज्यात समाज सुधारणा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी मदत केली. असे सांगून आज या महापुरुषांच्या ठाई असलेला आत्मविश्वास, इच्छाशक्ती व सकारात्मकता हे गुण आत्मसात होणे गरजेचे आहे.

आज ज्येष्ठांचा आदर होत नाही मुलांना योग्य मार्ग दाखवणारे सुशिक्षित आई ,वडील वृद्धाश्रमात का ? राहत आहेत याचा विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजन व जिजाऊ वंदना घेण्यात आली. यानंतर व्याख्याते प्रा.धनंजय झोंबाडे,शिवसेवा तालीम संघ शिवजयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक व सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कळंबचे सभापती शिवाजी आप्पा कापसे, विशेष निमंत्रित प्रमुख पाहुणे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे प्राचार्य, सुनील पवार, प्राचार्य अनिगुंठे (केज) प्रा. हेमंत भगवान, प्रा. सतीश लोमटे, प्रा. अरविंद शिंदे, प्रा. विलास अडसूळ, छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य पंडित शिंदे, प्रा. रघुनाथ घाडगे, प्रा. आनंत नरवडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सी. आर. घाडगे, मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांचा शाल, श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व गुण विकसित व्हावा यासाठी  कळंब परिसरातील विविध शाळेतील बाल व वक्त्याना भाषणे करण्याची संधी देण्यात येत आहे. या बाल वक्त्यांना शिवाजी कापसे, संजय होळे, युवा नेते पंडित देशमुख, राजेंद्र बिक्कड यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य महादेव गपाट, रमेश शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे प्रा. संजय घुले, शिवाजी कदम, मनोज कदम ,गणेश भवर ,प्रताप शिंदे ,गणेश स्वामी, राजाभाऊ गरड, विकी कदम, रोहित कापसे, नामदेव पौळ, गोविंद चौधरी, सुरेश शिंदे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.


 
Top