तुळजापूर (प्रतिनिधी) - तिर्थक्षेञ तुळजापूर परिसरातील यमुनाचल पर्वत रांगेत निसर्गरम्य सानिध्यात श्री कालिका देवी ठाणे असुन याचा वार्षिक महोत्सव रविवार दि. 18 फेब्रुवारी रोजी  मित्ती माघ कृ. 9 शके 1945 रोजी श्री कालिका देवी ठाण, अपसिंग रोड, टाटा संस्थान शेजारी संपन्न होत आहे.

कुलस्वामिनी आदिशक्ती श्री तुळजाभवानीच्या पुण्य उर्जित क्षेत्रात अनेक परिवार देवतांची ठाणी आहेत. नवदुर्गा (9 देवी), अष्टभैरव (8 भैरव), कुलदेवता, मठ अशी संपूर्ण दैवी निवासे परिपूर्ण शक्तीपीठात आहेत. त्या नवदुर्गातील एक पुराण कालीन, उर्जित असणारा यमुनाचल पर्वत रांगेत निसर्गरम्य सानिध्यात 'श्री कालिका देवीचे ठाणे सिंदफळ शिवारातील अपसिंग रोडवर टाटा संस्थानच्या शेजारी आहे. समस्त कासार समाजाचे कुलदैवत श्री कालिका या क्षेत्री

शीळरुपात वास्तव्यास आहे. या शिळारुपी कालिका देवीचा उल्लेख व पौराणिक कथा श्री कालिका पुराणातील अध्याय 44, ओवी 13 ते 97 मध्ये आढळतो. तुळजापूर मधील समस्त सो.क्ष. कासार समाज फार पूर्वी पासून प्रत्येक अमावस्येस या क्षेत्री पूजा-अर्चा व सेवा करीत आहेत.

या वार्षिक  धार्मिक उत्सवात पुढीलप्रमाणे  कार्यक्रम होणार आहेत. महापुजा, अभिषेक, नवचंडी यज्ञ, श्रीदुर्गासप्तशती पठण व महाआरती महापुजेचे यजमान श्री. सौ रुपाली सुधाकर बाहुबली शेटे, श्री.व सौ. नेहा विनायक सुधाकर शेटे हे दांम्पत्य आहेत.महाप्रसाद वाटपाने याचा सांगता होणार आहे.तरी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन सोमवंशिय क्षेञीय कासार समाज श्रीक्षेञ तुळजापूर यांनी केला आहे.


 
Top