धाराशिव (प्रतिनिधी)-आज महिला बाह्य सौंदर्याला भूलत असून स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष करतात .त्यामुळे अनेक आजारांच्या त्या वाहक सहज होत आहेत. वेळेत स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन करून आरोग्याकडे लक्ष द्या. योगा, प्राणायाम आणि चालणे या गोष्टी दररोजचा आपला भाग बनवा. असे प्रतिपादन श्री योगाच्या संचालिका कल्पना बोरा यांनी केले. रथसप्तमीनिमित्त त्यांनी खास महिलांसाठी सूर्यनमस्काराचे मोफत प्रात्यक्षिक ठेवले होते. यावेळी सलग 108 सूर्यनमस्कार करत महिलांनी अनोखी अशी रथसप्तमी साजरी केली. 

 महिला सूर्याची पूजा करून सूर्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतात. पूजा, उपवास करतात. गोडधोड खायला करतात. परंतु त्यांनी हे सर्व करत असताना सूर्यनमस्कार करावेत असेही त्या पुढे म्हणाल्या. या  वेळी 108 वेळा सूर्यनमस्कार सलग न थकता केलेल्या शामल वाघमारे यांना यावेळी विजेता म्हणून त्यांनी विशेष बक्षीस देऊन सत्कार केला. तर सीमा वाघमारे यांचा उपविजेता म्हणून गौरव केला. यावेळी सुनीता गुंजाळ, सौजन्या धावारे, सिंधू सावंत, सुषमा ढोकर, मानसी धावारे, सृष्टी थोडसरे यांनी यामध्ये सहभाग नोंदवून 108 सूर्यनमस्कार केले.


 
Top