धाराशिव (प्रतिनिधी) - जिल्हाधिकारी व पोलीस अधिकारी कार्यालयासह लोहारा तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी, पंचायत समिती व राज्याच्या पोलीस महासंचालक यांच्याकडे पुराव्यांसह तक्रार केलेली आहे. अद्यापपर्यंत संबंधितावर चचचच करण्यात यावी या मागणीसाठी दि.13 फेब्रुवारी रोजी करणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती शेतकरी विभागाचे राज्य कार्याध्यक्ष पंचाक्षरी चव्हाण यांनी दि.10 फेब्रुवारी रोजी केली.
धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी संघटनेचे राज्य संघटक गणी मुलाणी, जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा लता आगळे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, माहिती अधिकारामध्ये जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत सर्व तालुक्यातील अधिकारी कर्मचारी महसूल विभाग वन विभाग अधिकारी कर्मचारी हे सज्जावर राहतात किंवा नाही ? तसेच लोहारा पंचायत समितीमधील भागवत गायकवाड, नागेश शिंदेसह मुख्यालय राहतात किंवा नाही ? याबाबत माहिती मागितली होती. मात्र मला एकाही कार्यालयाने माहिती उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही. तसेच नागेश शिंदेने अजिनाथ हराळे यांच्या माध्यमातून 9 जून 2021 रोजी जिल्हा परिषदेची शाळा पाडली. त्याप्रमाणे प्रत्यक्ष स्थळ पाहणी अहवाल 25 जून रोजी केली. परंतू जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अद्यापपर्यंत कसल्याही प्रकारची कारवाई केली नाही. तसेच नागेश शिंदे यांनी मनात रोज ठेवून चव्हाण च्या विरोधात त्याची आई वडील यांच्यामार्फत संजय गांधी श्रावणबाळ योजनेची पगार चालू करतो म्हणून 3 हजार रुपये घेतले. त्यांच्या खोट्या सह्या केल्या चव्हाण यांच्या मुलाच्या नावे पाठविले होते. तर 15 फेब्रुवारी 2023 रोजी चव्हाण यांना रात्री 12 वाजता मारण्याची धमकी दिली. तसेच पोलीस अधीक्षक उपविभागी य पोलीस अधिकारी व लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही. तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.