धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रीय सेवा योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उप परिसर धाराशिव यांचे खेड येथे आयोजित विशेष वार्षिक श्रम संस्कार शिबिराचा पाचवा दिवस (दि. 10 फेब्रुवारी) या पाचव्या दिवसाची सुरुवात ही श्रमदानाने करण्यात आली. शिबिरार्थीनी शाळेमध्ये लॉन तयार करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे हराळ (गवत) रोपण केले.  कालांतराने शाळेच्या मध्यवर्ती भागामध्ये छान असे लॉन तयार होईल. या कामामध्ये शाळेतील शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी, तसेच मुख्याध्यापक श्री विकास मुळे यांनी मदत केली.

दुपारच्या सत्रामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे लक्ष्मण काकडे यांचे योग, साधना व ध्यान या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान डॉ. महेश्वर कळलावे, शिक्षणशास्त्र विभाग, विद्यापीठ उप -परिसर,धाराशिव यांनी भूषविले.  आपल्या मार्गदर्शनामध्ये श्री. काकडे यांनी शरीर, श्वास आणि मन या विषयी माहिती दिली. आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेविषयी तसेच श्री. श्री. रविशंकर गुरुजी यांच्या बाबत माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांन कडून सूक्ष्म योगा तसेच ध्यान करून घेतले. आपल्या अध्यक्षीय समारोपामध्ये डॉ. कळलावे यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग च्या माध्यमातून ध्यान आणि साधना या बाबतीत चांगले कार्य होत आहे व ते मानव जातीसाठी हितकारक आहे, असे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा लबडे यांनी तर श्वेता राजमाने यांनी आभार व्यक्त केले.


 
Top