धाराशिव (प्रतिनिधी)- येथील शासकीय विश्रामगृह येथे युवा भिम सेनेचे संस्थापक अध्यक्ष पंकज काटे, सं.उपाध्यक्ष मेहबूब भाई सय्यद, सं.सचिव राहुल लांडगे,महाराष्ट्र प्रवक्ते सुप्पी सय्यद, महाराष्ट्र संपर्क प्रमुख पंकज गायकवाड, महाराष्ट्र युवा नेते प्रीतम ओव्हाळ, यांच्या उपस्थितीत धाराशिव जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते यांनी जाहीर प्रवेश करून नियुक्ती पत्र देण्यात आले. 

धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी महादेव भोसले, युवक जिल्हाध्यक्ष यशपाल गायकवाड, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड,जिल्हा कार्यध्यक्ष लखण जाधव, जिल्हा संपर्क प्रमुख योगेश बनसोडे, जिल्हा संघटक गजफर सय्यद, धाराशिव शहर अध्यक्ष उमेश वाघमारे,धाराशिव तालुका अध्यक्ष अजय कदम,कळंब तालुका अध्यक्ष बबन सोनटक्के, कळंब शहर अध्यक्ष अमित जाधव,कळंब युवक तालुका अध्यक्ष विलास खुणे,उमरगा तालुका अध्यक्ष परमेश्वर लोखंडे, उमरगा शहर अध्यक्ष राजेश लोखंडे, इत्यादी पदअधिकारी यांना पदभार देवुन शेकडो कार्यकर्ते यांनी जाहीर प्रवेश केला.


 
Top