परंडा (प्रतिनिधी) - मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दि. 14 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत तहसील कार्यालय परंडा व शिक्षण विभाग परंडा यांच्यातर्फे शासन परिपत्रकानुसार साजरा करण्यात आला. त्या निमित्त परंडा तालुक्यातील शाळा स्तरावर केंद्र स्तरावर व तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या  वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, काव्य गायन स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, एकपात्री नाटक इत्यादी स्पर्धामध्ये प्राविण्य मिळविलेल्या जिल्हा परिषद शाळा व खाजगी शाळा मधील 5 वी ते 8 वी लहान गट  तसेच इयत्ता 9 वी ते 12 वी मोठा गट याप्रमाणे दिनांक 2/2/2024 रोजी मा. तहसीलदार श्री घन :श्याम आडसूळ नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर गटविकास अधिकारी संतोष नागटिळक. गटशिक्षणाधिकारी  आर्जून जाधव शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यभान हाके यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद प्रशाला कॅम्पस परांडा येथे  शुक्रवार दि. 2 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी ठीक 3

वाजता पदक व प्रमाणपत्र देऊन करण्यात येणार आहे. 

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त पांडुरंग माढेकर नायब तहसीलदार परंडा यांचे व्याख्यान देखील होणार आहे. उपरोक्त दिवशी शिक्षण विभागातील मुख्याध्यापक शिक्षक व स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी तसेच शिक्षण प्रेमी नागरिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तहसिलदार घन:श्याम आडसूळ यांनी केले आहे.


 
Top