धाराशिव (प्रतिनिधी)-शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या ढोबळे कॉम्प्लेक्समध्ये एका तरुणाने आत्महत्या केली असून, शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. किमान 3 ते 4 दिवसापूर्वी ही आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान पोलिस घटनास्थळी पोहोचले असून, आत्महत्येचे नेमके कारण काय,हे तपासानंतर स्पष्ट होईल. हे कॉम्प्लेक्स उबाठा गटाच्या युवा सेनेचे विभागीय सचिव अक्षय ढोबळे यांच्या मालकीचे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मूळचा आळणी येथील हा तरुण ढोबळे कॉम्प्लेक्स येथे काही वर्षांपूर्वी पानाचे दुकान चालवत होता. याच कॉम्प्लेक्समध्ये तिसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या बांधकामाच्या एका बंद रूममध्ये त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येची माहिती सुमारे तीन ते चार दिवसांनी कॉम्प्लेक्स मालकास कळाली. त्यामुळे त्यांनी घटनास्थळाला भेट देत पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. 


 
Top