धाराशिव (प्रतिनिधी)-मोबाईल चोरीच्या संशयावरून काही तरूणांनी अमर लोमटे या 27 वर्षीय तरूणाला बेदम मारहाण कली. जनावराला मारावे तसे मारहाण केल्याने अमर यांचा मृत्य झाला. ढोकी पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना ढोकी येथील तेरणा साखर कारखाना जवळ घडली असून, पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

मोबाईल चोरीचा संशय घेवून अमर लोमटे यांला उसाने, काठीने बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याचा व्हिडीओ बनविण्यात आला. अमरचे वडील राजेंद्र लोमटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय उर्फ बबलू दत्ता इंगळे, संतोष दादाराव वाघमारे, अकबर शेख, शंकर चौधरी यांच्यासह अन्य लोकांवर कलम 302 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष तिगोटे हे करीत आहेत. पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून, इतर आरोपींचा शोध घेत आहेत.


 
Top