तुळजापूर (प्रतिनिधी)-  छञपती शिवाजी महाराज जयंती निमित्त्ताने जवाहार गल्लीतील शेकडो महिलांनी छञपती शिवाजी महाराज, छञपती संभाजी राजे पुतळा परिसरात जावुन 1001  दीप प्रज्वलन करुन दिपोत्सव साजरा करुन छञपती शिवाजी महाराज यांचे अभिवादन केले. दीपोत्वसव नंतर पेढे वाटप करण्यात आले.

प्रथमता छञपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचे पूजन  माता भगिनी यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर  1001 दीप  प्रज्वलन करुन दीपोत्सव साजरा केला. याप्रसंगी  युवा नेते रणजित इंगळे, आनंद जगताप, श्रीकांत धुमाळ, श्रीकांत कदम, राजाभाऊ कदम, दिलीपराव हुच्चे, सुरेशराव अणदूरकर, दीपकराव मोहिते, राजेंद्र भांजी, दिलीप रसाळ, मोहन पांढरे, विलास इंगळे, सुदर्शन पांढरे, आप्पासाहेब कदम, नारायण शिंदे, तानाजी मगर, बाबासाहेब पांढरे, पिंटू जटाळ, राजेश मगर, मकरंद कदम, अण्णा मगर सह कै. विश्वास काका इंगळे विचार मंच व जवाहर तरुण मंडळचे पदाधिकारी कार्यकते उपस्थितीत होते.


 
Top