धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. सावता फुलसागर हे लाभले होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. श्रीराम नागरगोजे हे होते. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संदीप देशमुख यांनी केले. तर आभार समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. माधव उगिले यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. केशव क्षीरसागर यांनी केले. याप्रसंगी माजी विद्यार्थी यांनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


 
Top