तेर (प्रतिनिधी) राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार महादेव जानकर हे पळसप येथे 9 वे मराठी साहित्य संमेलनास जात असताना तेर येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे कट्टर समर्थक सामान्य घरातील कार्यकर्ता असणारे विजय वैद्य यांच्या जय मल्हार किराणा ड्रायफुड या दुकानाला भेट दिली.यावेळी विजय वैद्य व राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नोटांचा हार घालुन फटाक्यांच्या आतिषबाजी करत महादेव जानकर यांचे स्वागत केले यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकारिणी सदस्य अश्रुबा कोळेकर, तालुकाध्यक्ष सचिन देवकते, संपर्क प्रमुख सोमनाथ धायगुडे, पवन माने, अजित माने, प्रवीण बंडे, हरी राऊत आदी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.