तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथे आठ दिवसापासून सुरू असलेल्या अखंड हरी नाम सप्ताह व छत्रपती शिवाजी महाराज शौर्यकथा  सोहळ्याची हभप. रोहिदास महाराज हांडे यांच्या काल्याचे किर्तनाने  गुरुवारी  सांगता झाली.

सप्ताह काळात काकडा आरती, विष्णू सहस्त्र नामव रोज रात्री किर्तन आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाज प्रबोधनकार  हभप सागर महाराज बोराटे  नातेपुते ,  युवा व्याख्याते  हभप अविनाश महाराज भारती बीड,  विनोदाचार्य  हभप पांडुरंग महाराज उगले परभणी , राष्ट्रीय शिवशंभू व्याख्याते  हभप कबीर महाराज अत्तार  कराड शिव व्याख्याते हभप निलेश महाराज कोरडे , किल्ले शिवनेरी  द कूट अभंग प्रवक्ते  महादेव महाराज राऊत  बीड, समाज प्रबोधनकार हभप संग्राम  महाराज भंडारे पाटील आळंदी देवाची या महाराष्ट्रातील  नामवंत किर्तनकाराची किर्तन सेवा पार पडली.7 फेब्रुवारी रोजी सांयकाळी  महिलांनी डोक्यावर कलश घेऊन भव्य शोभायात्रा काढली. 8 रोजी ह.भ.प  शिव व्याख्याते ह.भ.प.रोहिदास महाराज हांडे   यांच्या काल्याचे किर्तनाने सप्ताहाची व.महाप्रसादाने या कार्यक्रमाची समारोप झाला. काल्याच्या कीर्तनाला जि.प.च्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्यासह हजारो भाविक भक्त उपस्थिती होते.


 
Top