तुळजापूर (प्रतिनिधी) - तिर्थक्षेञ येथील  क्षत्रिय कुलावंतस (मावळा) प्रतिष्ठान  शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या शिवमुर्ती  भव्य मिरवणुकीत  सादर करण्यात आलेल्या  महाकाल अघोरी हा सजीव देखावा पाहण्यासाठी शहरवासियांनी प्रचंड गर्दी केली होती. या देखाव्याने शहरवासियांचे मने जिंकली.

शहरातील शुक्रवार पेठ भागातील क्षत्रिय कुलावंतस (मावळा) प्रतिष्ठान दरवर्षी छञपती शिवाजी महाराज जयंती भव्यदिव्य वैशिष्ट्ये पुर्ण मिरवणूक काढुन साजरे करते. यंदाच्या शिवजयंती मिरवणूकीत हरियाना राज्यातील निस्सार येथील वीस कलाकरांनी महाकाल अघोरी हलता देखावा सादर  केला. हा देखावा पाहण्यासाठी आबालवृध्दांची प्रचंड गर्दी झाली होती. या हलत्या देखाव्यात शंकर पार्वती नंदीवर आरुड, गणपती, राक्षसे सह विविध देवतांच्या हलत्या देखाव्याने तिर्थक्षेञी तुळजापूर नगरीत महाकाल अघोरी देखाव्याने  शहरवासियांचे मने जिंकले. यात हवेत उडणारा जाळ गळ्यात, कवठ्याची माळ घातलेले महाकाल शंकर वर नागफणी अशा विविध रुपातील हलते देखावे शहरवासियांचे आकर्षण ठरले होते.

शुक्रवार पेठ येथुन या शिवजयंती मिरवणुकीस छञपती शिवाजी महाराज मुर्ती पुजन करुन झाला. तेथुन आर्य चौक, कमान वेस, मंगळवार पेठ, छञपती शिवाजी महाराज चौक, भवानी रोड मार्ग याचा सांगता राञी श्रीतुळजाभवानी मंदिर महाध्दार समोर झाला.

या शिवजयंती मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट, धांगडधिंगा, गोंधळ  घालणारे युवक सहभागी झाले नव्हते. ही मिरवणूक पाहण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी मिरवणूक मार्गावर झाली होती.


 
Top