तुळजापूर (प्रतिनिधी)-मातंग समाजाला एस सी प्रवर्गात अ, ब,क,ड करून आरक्षण द्यावे, तुळजापूर शहरातील मातंग समाजाच्या युवकांवर जीव घेणा हल्ला केलेल्या आरोपीला तात्काळ अटक करून मोक्का अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी यासह आदी मागण्या करिता लहुजी शक्ती सेनेच्यावतीने हलगी मोर्चा काढून तहसिल कार्यालयासमोर दोन तास ठिय्या आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने दि.31 जानेवारी रोजी बुधवारी काढण्यात आला. यावेळी उपस्थित समाजबांधवांनी मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय आणि त्याकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष याबाबत तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या.

या आंदोलना दरम्यान मातंग समाजाला एस सी प्रवर्गात अ, ब,क,ड करून आरक्षण द्यावे, तुळजापूर शहरातील मातंग समाजाच्या युवकांवर जीव घेणा हल्ला केलेल्या आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी, तुळजापूर येथे साहित्यरत्न डॉ. आण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व पुतळ्याचे काम लवकर सूरू करावे, हलगी वादक कलाकार व बँड-वादक कलाकारांना शासनाकडून दरहीना पेन्शन योजना सुरू करावी या मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे,जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, उपाध्यक्ष विजय क्षीरसागर, सुरेश भिसे, किरण कांबळे, आकाश शिंदे, किशोर साठे सह आदी मातंग समाज, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


 
Top