धाराशिव (प्रतिनिधी) - येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसिलदार या पदावर कार्यरत असणारे, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व व्हिजन करिअर अकॅडमीचे मुख्य मार्गदर्शक चंद्रकांत विठ्ठल शिंदे यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभामध्ये त्यांचा अनेक मान्यवरांनी सहृदय सत्कार करून शुभेच्छा दिल्या. 

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नायब तहसिलदार शिंदे यांचे प्रशासकीय सेवेतील कामकाज आणि सामाजिक जीवनातील कामकाज अर्थात चंद्रकांत दादांनी आपल्या प्रशासकीय सेवे बरोबरच राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी राहून अनेक कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडण्यासह राज्यातील कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांना न्याय मिळवून देण्याचे  काम केले. तसेच  आपल्या सामाजिक जीवनामध्ये  व्हिजन करिअर अकॅडमीचे मार्गदर्शक म्हणून बहुजन समाजामध्ये एक कुटूंब, एक अधिकारी ही संकल्पना उराशी बांधून कित्येक गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात सहकार्य करण्याचे ऐतिहासिक काम केले आहे. याची दखल घेऊन व्हिजन करिअर अकॅडमी व्यवस्थापक समिती व सर्व मित्रमंडळीच्यावतीने सोनाई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रा.डॉ.सुरज ननवरे, मिलिंद कोळंबीकर, मुखेडचे तहसिलदार राजेश जाधव, नायब तहसिलदार मुस्तफा खोंदे (कळंब), कळंब, संतोष पाटील (तुळजापूर), प्रा. एम.जी. पवार आदींसह सांची शिंदे, प्रा.हनुमंत सपकाळ, रमाकांत गायकवाड, बाळासाहेब वाघमारे, वंचितचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, मिलिंद रोकडे, बसपाचे प्रदेश सचिव व्यंकट बर्गे, व्हिजन करिअर अकॅडमीचे संचालक फुलचंद कांबळे, स्पर्धा परीक्षा लेखक व मार्गदर्शक प्रा सुरज शेख (लातूर), प्रा.डॉ.शेलसुरेकर (परभणी), सपोनि राहुल कोळंबेकर, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे रवी मोहिते, राजेश भवाल, महसूल संघटनेचे सेक्रेटरी बालाजी पांचाळ, कार्याध्यक्ष यशवंत डोलारे, मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जयपाल शेरखाने, शिक्षक संघटनेचे बालाजी तांबे, बशीर तांबोळी, सामाजिक कार्यकर्ते रमाकांत गायकवाड, व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, साहित्यिक विजयकुमार गायकवाड, तंत्र शिक्षण विभाग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.आर. जाधव, किशोर प्रताळे, कोरे, गजेंद्रसिंह राजपूत, तुळजापूर तहसिलचे अमित सोनवणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सुनीता शिंदे, उपाध्यक्ष संजय गायकवाड, सचिव विलास शिंदे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमा प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तर चंद्रकांत विठ्ठल शिंदे व त्यांच्या पत्नी सुनीता चंद्रकांत शिंदे यांचा सामूहिक सत्कार करण्यात आला.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखक विजय बनसोडे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. श्रीधर आघाव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी, कवी पंडित कांबळे, प्रा.रवी सुरवसे, बाळासाहेब शिंदे, राजु शिंगाडे, अंकुश उबाळे, पृथ्वीराज चिलवंत, आदिनाथ सरवदे, शिलरत्न शिंदे, मनोज ओहाळ, सुजय सोनवणे, पवन धालवडे, अजय गरड, मुकेश मोटे, अमित शिंदे, राहुल आटोळकर, चंदनशिवे,  व जकाते यांनी परिश्रम घेतले


 
Top