धाराशिव (प्रतिनिधी)-कर्ज देतो म्हणून ऑनलाईन पध्दतीने घेतलेले 53 हजार 667 रूपये परत मिळवून देण्यास सायबर पोलिसांना यश आले आहे.

दि 31 मार्च 2023 रोजी मनिषा रविंद्र गायकवाड, वय 38 वर्षे, रा.उपळा ता. जि. धाराशिव या लोन घेण्यासाठी मोबाईलवर लोन ॲप सर्च करत होत्या. तेव्हा मी निधी शर्मा नावाने कॉल आला. वेगवेगळ्या फोनवरून कॉल करून तुम्हाला तीन लाख रुपये लोन देते, असे सांगून प्रोसेसींग फीस पाठवा असे सांगितले. फिर्यादीच्या मोबाईलवर पाठवलेल्या क्युआर कोड वर एकुण 73,555 पाठवले. त्यांना कसले ही लोन मिळाले नाही.  त्यांची फसवणुक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मनिषा गायकवाड यांनी पोस्टे सायबर येथे सदर घटनेबाबत फिर्याद दिल्याने पोलीस ठाणे सायबर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्हृयाच्या तपासा दरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती बबीता वाकडकर, पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे व महिला पोलीस अमंलदार अपेक्षा खांडेकर सह सायबर पोलीस ठाण्याचे पथक यांनी नमुद गुन्ह्याचे तपासात तांत्रिक विश्लेषण करुन तसेच आरोपीचे बॅक खात्यांची माहिती घेवून फिर्यादी यांनी पाठवलेले 73 हजार 755 रुपये रक्कमे पैकी 53 हजार 667 रुपये होल्ड करुन सदर रक्कम ही न्यायालयाचे आदेशावरुन फिर्यादीस परत करण्यात यश मिळवले आहे. 
Top