धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव येथे दि. 11 फेब्रुवारी 2024 रोजी मोफत सर्वरोग निदान व उपचार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी, उपचार करण्यात आले.

रविवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी भारत विद्यालय, धाराशिव येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 725 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यापैकी 90 रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. या वेळी उदघाटन माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रमुख पाहुणे युवा मोर्चा राजसिंह राजेनिंबाळकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य  युवराज नळे, शहराध्यक्ष अभय इंगळे, माजी  जिल्हा हिवताप अधिकारी बखत्यार अहेमद, रजवी  बिलाल, रजवी रय्यान, प्रा. ए. झे. पटेल, उस्मान अन्सारी, मोसीन मिर्जा, फेरोज शेख, परवेज शेख, समीर शेख, शम्सु शेख, महेबुब शेख, सदिक शेख, सलमान शेख इत्यादी ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ. अभिजीत यादव, डॉ. कपील डोंगरे, डॉ. पंकज बागुल, डॉ. प्रज्वल उकळीकर, डॉ. सचिन शिंदे, डॉ. वर्षा दाखले, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे, अमिन सय्यद, विनोद ओव्हाळ, तोफीक मनियार, रवी शिंदे, दिलीप दाखले, अजमेर मुलानी, शेख फरीद सय्यद, सचिन व्हटकर, संदिप खोचरे यांनी परिश्रम घेतले.


 
Top