धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपळा (बु) ता. तुळजापूर जि.धाराशिव येथे दि. 19 फेब्रुवारी 2024 रोजी मोफत सर्वरोग निदान व उपचार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी, उपचार करण्यात आले.

सोमवार दि.19 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपळा (बु) ता. तुळजापूर जि.धाराशिव येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 400 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यापैकी 50 रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे विशाल जाधव, जि.प चे मुख्याध्यापक लोखंडे सर, वाघमारे सर, मारुती लोहार, सोमनाथ मोरे इत्यादी ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ. भावी बोरीच्या, डॉ. मुर्तुजा भोरा, डॉ.फाईम अहेमद, डॉ. बेटसी, डॉ. स्नेहल शिंदे यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, संदिप खोचरे यांनी परिश्रम घेतले.


 
Top