धाराशिव (प्रतिनिधी)-रुपामाता अर्बन क्रेडिट सोसायटीच्या मुख्य कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी शिवजयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. 

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य हा भारताच्या इतिहासातील एक दैदीप्यमान अध्याय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय, सामाजिक आर्थिक आणि प्रशासकीय ध्येय धोरणे आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या जयंती दिनी सर्वांनी शिवचरित्राचे वाचन करून, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचे  आवाहन यावेळी रुपामाता अर्बन व मल्टीस्टेट चे संस्थापक अँड. व्यंकटराव गुंड यांनी केले. यावेळी रुपामाता मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद खांडेकर व अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी  सत्यनारायण बोधले, सरव्यवस्थापक विजयकुमार खडके, सस्थेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी, ग्राहक, खातेदार उपस्थित होते.


 
Top