धाराशिव (प्रतिनिधी)- सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि धाराशिव जिल्हा प्रशासन,धाराशिव यांच्या समन्वयातून श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन 29 फेब्रुवारी ते 4 मार्च 2024 पर्यंत श्री.तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल,धाराशिव येथे करण्यात येणार आहे.

29 फेब्रुवारी रोजी पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सांवत हे महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन करतील. यावेळी विशेष अतिथी म्हणून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार सर्वश्री विक्रम काळे, सतिश चव्हाण, सुरेश धस, ज्ञानराज चौगुले, राणाजगजितसिंह पाटील व कैलास पाटील यांची तर प्रमुख अतिथी म्हणून राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिली.

या पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवात गोंधळ, बंजारा नृत्य, धनगरी ओव्या, भारुड, दिंडी, पोवाडा, मोरूची मावशी, पसायदान, संबळ, बासरी वादन, शिवचरित्र कथा, नृत्य, तबला जुगलबंदी, पोवाडा, वासुदेव, भारतीय संविधान जनजागृती, धाराशिव पर्यटन व पुरातत्व विभागावर माहितीपट, रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक, जोगवा नृत्य, संस्कृती महाराष्ट्राची, भीमगीत, शिवचरित्रावर व्याख्यान, मर्दानी खेळ, शास्त्रीय गायन, स्कीट, गझल मुशायरा, चला हवा येऊ द्या, लावणी, गवळण, राणी येसूबाई, महाराष्ट्राची लोकधारा, सूरबहार संगीत मैफल, सुगम गायन, जल्लोष सिनेतारकांचा व पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप होईल. स्थानिक कलावंतांच्या कलागुणांना या पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवात प्रोत्साहन देण्यात येणार आहे.


 
Top