तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथील  श्रीतुळजाभवानी मातेच्या सिंहासनावर शुक्रवार दि. 16 फेब्रुवारी रोजी रथसप्तमी निमित्त रथअलंकार अलंकार महापूजा मांडण्यात आली होती.

रथअलंकार पुजा भगवान सूर्यनारायणांनी श्री देवीस त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ दिला.त्या प्रसंगाची आठवण म्हणून रथ अलंकार महापूजा बांधली (मांडली) जाते. रथसप्तमी पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ भाविकांनी गर्दी केली होती.


 
Top