उमरगा (प्रतिनिधी)-मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी माडज येथील तरुण किसन चंद्रकांत माने यांनी तळ्यात उडी घेऊन जीव दिला होता. माने कुटुंबियांना आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख रूपयाचा धनादेश तहसीलदार गोविंद येरमे यांच्या हस्ते देण्यात आला. 

माडज येथील तरुणाने तळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली येथील उपोषणाने सर्व मराठवाड्यात मराठा समाजाला आरक्षण दवण्याची मागणी वाढत होती दरम्यान माडज येथील तरूणाने आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आत्महत्या केली होती. त्या वेळी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी तात्काळ माने कुटुंबियांना पाच लाखाची मदत दिली होती. त्यानंतर शासन दरबारी पाठपुरावा करून आमदार चौगुले यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दहा लाख मिळावेत म्हणून प्रयत्न केले होते त्या मुळे सोमवारी तहसील कार्यालयात  मयत माने यांच्या  मातापित्यांच्या हातात दहा लाखाचा धनादेश देण्यात आला.

माने कुटूंबाना मदत मिळावी म्हणून विनायकराव पाटील, किरण गायकवाड, रमेश माने, मधुकर माने, राजेंद्र माने, राम पाटील, माडज गावचे उपसरपंच नरेंद्र नाना माने, काका गायकवाड, शरद माने,बळी गायकवाड, विजयराज माने ज्ञानबा काळे संतोष पाटील,रवि पाटील, बळीराम मारेकर, शिवाजी माने,आदन पाटील सोनु घाडगे आदी माडज येथील नागरिकांनी जोर लावला होता त्या मुळे आमदार चौगुले यांनी विशेष प्रयत्न करून ही मदत मिळवून दिली आहे.


 
Top