धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेमधील स्वयंसेवक स्वयंसेविका यांनी शपथ घेतली. मौजे वरुडा गावातून प्रभात फेरी काढुन मतदारांना जागृत करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. माधव उगिले यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सर्व स्वयंसेवकांना शपथ दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख व महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


 
Top