धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा मुस्लीम समाजाचे नेते इलियास मुजावर यांची ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहेमद अन्सारी हस्ते मुजावर यांना देण्यात आले.
या निवडीबद्दल शहरातील प्रतिष्ठीत नागरीक व इतर संघटनांच्या वतीने बारा बलुतेदार महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय शिंगाडे यांच्या संपर्क कार्यालयात शाल, श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
यावेळी धनंजय शिंगाडे, खलील सय्यद, समीयोद्दीन मशायक, ॲड.परवेज अहेमद, मुस्ताक कुरेशी, लक्ष्मण माने, रवी कोरे, अभिजीत गिरी, जैनोद्दीन मुजावर, हिदायतुल्ला कोरबो, नीवर काझी, रफीक सय्यद, श्रीकांत माळाळे, शिवानंद कथले व इतर मान्यवर उपस्थित होते.