धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करण्यात आली .

यावेळी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख आणि महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. माँसाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख आणि प्रा.भाग्यश्री गोंदकर यांच्या शुभ हस्ते पूजन करण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख आणि महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र, धाराशिव चे समन्वयक डॉ. डी.एम.शिंदे  यांच्या शुभ हस्ते विवेकानंद सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी नाणेफेक करून खो -खो संघाचा सामना सुरू केला. यावेळी शारीरिक शिक्षण संचालक प्रा.अजिंक्य रेणके, दत्तात्रय जावळे पंच म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी महाविद्यालयातील कनिष्ठ उपप्राचार्य बबन सूर्यवंशी, प्रबंधक दिलीप लोकरे, कार्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


 
Top