धाराशिव (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगर येथे नुकतीच समाजवादी पार्टीची विभागीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये समाजवादी पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यांनी प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड. रेवण भोसले यांच्या उपस्थितीत धाराशिव जिल्हाध्यक्षपदी शाहूराज खोसे यांची नियुक्ती केली आहे. शाहूराज खोसे गेल्या 40 वर्षापासून जनता पार्टी, जनता दल सेक्युलर व आता समाजवादी पार्टीमध्ये काम करत आहे. त्यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका ही लढवल्या आहेत. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, प्रधान महासचिव परवेज सिद्दिकी, युवाजन प्रदेशाध्यक्ष फयाद अहमद, डॉ. रऊफ शेख, ॲड. शिवाजी कांबळे, फैसल खान, आयुब खान, महिला सभाअध्यक्ष मायाताई चौरे आदीसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खोसे यांच्या समाजवादी पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


 
Top