नळदुर्ग (प्रतिनिधी)-परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग चे संस्थापक सचिव मारुती बनसोडे यांची तुळजापूर तालुका बाल संरक्षण समितीवर सामाजिक कार्यकर्ता म्हणून निवड करण्यात आली आहे. तहसीलदार हे या समितीचे अध्यक्ष असून, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी या समितीचे सदस्य सचिव आहे. ही निवड पाच वर्षासाठी आहे. 

मारुती बनसोडे हे गेली 38 वर्षे सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करीत असून त्यांनी बाल पोतराज यांच्या सामाजिक व शैक्षणिक पुनर्रचनासाठी काम केले आहे. त्याचबरोबर संकटात असलेल्या बालकांना संरक्षण देण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक वर्षे काम केले आहेत. या कामाची दखल घेऊन सन्माननीय तहसीलदार साहेब यांनी या समितीवर त्यांची निवड केली आहे. परिवर्तन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मारुती बनसोडे यांनी जिल्ह्यामध्ये गेली 27 वर्ष फार मोठे काम केले आहे. महिला व बालकांच्या प्रश्नावर विशेषतः त्यांनी काम केले असून महिला बचत गट, विधवा, निराधार,परित्यक्ता एकलमहिला, शेतकरी, शेतमजूर, अल्प खर्चिक शाश्वत शेती तंत्रज्ञान प्रचार प्रसाराचे काम ही ते करीत आहेत. तर पौष्टिक तृणधान्य प्रोत्साहन अभियानामध्येही सध्या ते काम करीत आहेत. जिल्ह्यातील अनेक बालकांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. म्हणून त्यांची ही निवड सार्थ आहे. या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. 


 
Top