धाराशिव (प्रतिनिधी)-आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित के .टी .पाटील संगणकशास्त्र महाविद्यालय व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत राष्ट्रमाता जिजाऊ व थोर भारतीय तत्त्वज्ञ व शिक्षणतज्ञ स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजित मसलेकर यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनावर विचार व्यक्त करताना डॉ. अजित मसलेकर म्हणाले की ,“जिजाबाई या सद्गुणी, दूरदृष्टीच्या तसेच शौर्यवान असून त्या कुशलतेने घोडेस्वार व तलवारबाजीही चालवत होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे आयुष्य घडवण्याचे व संस्कार करण्याचेही कार्य त्यांनी केले“. आज जिजाऊ सारख्या माता निर्माण व्हायला हव्यात म्हणजे शूरवीर पुत्र जन्माला येतील.

युवकांचे प्रेरणास्थान व थोर भारतीय तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ञ स्वामी विवेकानंद यांची जयंती युवक दिन म्हणून साजरी करण्यात येते. स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धर्माची ओळख जगाला 11 सप्टेंबर 1893 च्या अमेरिकेतील शिकागो धर्मपरिषदेत करून दिली.“उठा ,जागे व्हा, आणि आपले ध्येय सिद्ध होईपर्यंत अविरतपणे परिश्रम करत राहा“ या स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची आठवण डॉ अजित मसलेकर यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. यावेळी कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक प्रा. शुभम पाटील, प्रा.गवळी मॅडम, प्रा.शेख मॅडम, प्रा. पटेल मॅडम, प्रा. बदे मॅडम, शिवकुमार, अजय शिराळ, सुदर्शन कुलकर्णी, प्रवीण पांचाळ,मनीयार वकील,तसेच उपस्थितीत विद्यार्थी व विद्यार्थिनींनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.


 
Top