धाराशिव (प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीच्या वतीने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन संघटनात्मक पक्ष बांधणी करण्यासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या विधानसभा संयोजक समितीमध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या कामासाठी येथील भारतीय जनता पार्टीचे युवक कार्यकर्ते दिनेश बागल यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड झाल्याबद्दल आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

तुळजापूर विधानसभा संयोजक या महत्त्वाच्या संघटनात्मक कामासाठी भाजपचे सक्रिय युवक कार्यकर्ते दिनेश बागल यांची पक्षाचे युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी निवड केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती आगामी निवडणुकीच्या कालखंडात महत्त्वाचे संघटनात्मक काम करणार आहे. या निवडीबद्दल आमदार राणा जगदीश पाटील आमदार सुजितसिंह ठाकूर,जिल्हा अध्यक्ष संताजी राव चालुक्य,तालुका अध्यक्ष संतोष बोबडे,युवक जिल्हाध्यक्ष राजसीह निंबाळकर,युवक नेते विनोद गंगणे,नगर अध्यक्ष सचिन रोचकरी,विशाल रोचकरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य गुलचंद व्यवहारे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी दिनेश बागल यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव केला आहे.


 
Top