भूम (प्रतिनिधी)-दि 22 जानेवारी 2024 रोजी मौजे वालवड येथे दि.16 जानेवारी पासून राष्टीय सेवा योजना विभागाचे श्रमसंस्कार शिबीर आयोजित केले होते. त्या शिबिराचा आज समारोप कार्यक्रम मोठया उस्तवात पार पडला. 

या कार्यक्रम ची सुरुवात सर्वप्रथम आई जिजाऊ व सावित्रीबाई फुले, गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.नंतर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत समारंभ पार पडला. या कार्यक्रमचा समारोप करताना रा. से. योजना स्वयंसेवक यांनी संस्कृतीक कार्यक्रम च्या माध्यमातून आपली कला सादर केली. सोबतच सामाजिक प्रबोधन केले. या कार्यक्रमाला गावातील सरपंच प्रभावती देऊळकर, उपसरपंच कृष्णा मोहिते ग्रामपंचायत सदस्य, पुढारी, सामाजिक कार्यकर्ते,गावकरी उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. चंदनशिव, वि, वि मंडळ स्वस्था अध्यक्ष डी.डी. बोराडे, स्वस्था उपसचिव व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष शिंदे, उपप्राचार्य डी.व्ही शिंदे, प्रा. पाटील उपस्थित होते. याशिवाय महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आलेले अनुभव कथन केलेत. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. अलगुंडे शितल यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. तसेच सर्व गावकरी यांचेही महत्वाचे योगदान होते. ज्या विदयार्थ्यांनी शिबारात चांगले काम केले त्यांना प्राचार्य, स्वस्था प्रतिनिधी, उपप्राचार्य यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. कार्यक्रम अधिकारी डॉ. नितीन पडवळ, प्रा. दीप्ती गिरी, प्रा. नंदू जगदाळे प्रा. गंगाधर काळे, प्रा. श्रीमंत पाटील यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गंगाधर काळे यांनी केले. तर आभार नंदू जगदाळे यांनी केले.


 
Top