भूम (प्रतिनिधी)- खेळातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण होण्याबरोबरच विद्यार्थ्यांचा सुप्त मानसिक हुशारीक विकास होत असतो असे प्रतिपादन गुरुदेव दत्त हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक अरुण गायकवाड यांनी केले.
प्राईड इंग्लिश स्कूल मध्ये आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन अरुण गायकवाड यांच्या हस्ते मशाल प्रज्वलीत व हिरवा ध्वज धाकवून पालकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तत्पूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. शाळेने खेळाला दिलेले महत्त्व हे अत्यंत स्तुत्य असून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत खेळाला अनन्यसाधारण महत्त्व असून पालकांनी आपल्या पाल्यांना खेळाच्या माध्यमातून सशक्त करणे आवश्यक आहे असेही अरुण गायकवाड यांनी सांगितले. प्राईड इंग्लिश स्कूलच्या या क्रीडा महोत्सवासाठी पालकांची उपस्थिती लक्षनिय होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपिका टकले यांनी तर प्रास्ताविक मेघा सुपेकर तर आभार सरस्वती कुलकर्णी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशा म्हेत्रे, अरुणा बोत्रे, अमित सुपेकर, गणेश सुपेकर आदींनी परिश्रम केले.