परंडा (प्रतिनिधी)-मराठी पहिले वृत्तपत्र 'दर्पण' आजच्या दिवशी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. हाच दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. शहरातील सोशल मिडिया सेंटर मध्ये पत्रकार तर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विजय माने, आनंद खर्डेकर, निसार मुजावर, गणेश राशनकर, नुरजहाँ शेख, शहाजी कोकाटे, भजनदास गुडे, प्रशांत मिश्रा, सुरेश बागडे, सचिन कुलकर्णी, सुहास मस्के, आशुतोष बनसोडे उपस्थित होते.


 
Top