तुळजापूर (प्रतिनिधी)-श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र सावरगांव येथे प्रतिवर्षा प्रमाणे रविवार दि. 7 जानेवारी रोजी भगवान श्री पार्श्वनाथ जन्मकल्याणिक महामहोत्सव वार्षिक निमित्ताने पुढील धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
श्री 1008 अंतरिक्ष नेमिनाथ भगवान श्री 1008 पार्श्वनाथ भगवान प.पू. श्री 108 आनंदसागरजी प.पू. आचार्य श्री 108 सूर्यसागरजी प.पू.श्री 105 श्रुतसागरजी संघ यांच्या आशिर्वादाने सावरगावी श्री दिगंबर जैन अतिशय क्षेत्र सावरगाव येथे भगवान श्री पार्श्वनाथ जन्मकल्याणिक महामहोत्सव मिती मार्गशीर्ष वद्य 11 (जैन मिती पौष वद्य 11) रविवार दि. 7 जानेवारी रोजी साजरा केला जात आहे. रविवार सकाळी ध्वजारोहण 9 ते 9.30 कुंभमेला, 9.30 ते 10.30 विधान व अभिषेक सकाळी 10.30 से 1 पालखी मिरवणूक व अभिषेक दुपारी 2.30 ते दुपारी 1 ते 2.30महाप्रसाद भोजन असुन तरी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन विश्वस्त प्रदिप मेहता वैभव मेहता यांनी केले आहे.
श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेञ सावरगाव !
श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर मंदीर अतिशय क्षेञ सावरगाव ता तुळजापूर येथे ऐक अतिप्राचीन दिंगबर जैन मंदीर असुन हे 1000 वर्षा पुर्वीचे असल्याचे सांगितले जाते. येथे पाषाणाची प्राचीन मुलनायक 1008 पाश्वनाथ भगवान यांची पद्मासनस्थ चार फुट मनोज्ञ मुर्ती शिखरामध्ये 1008श्री नेमिनाथ भगवान यांची अंतरिक्ष मुर्ती आहे. या क्षेञावर मुलनायक प्रतिमेसमोर चतुर्मुख जिनबिंब विराजमान आहेत. हे जैन समाजाचे पविञ स्थान आहे. हे मंदीर हेमाडपंथी आहे. मंदिर परिसरात धर्मशाळा, मानस्तंभ आहे. येथे मूलनायक श्री 1008 पार्श्वनाथ भगवान ची 1000 वर्ष प्राचीन पद्मासनस्थ मनोज्ञ मूर्ति प्रतिष्ठापीत केलेली आहे. परमपूज्य 108 श्री आनंदसागर महाराज यांची ही सल्लेखना भूमि आहे. येथील मंदिराचे शिखर काचेचे असून, श्री 1008 अंतरिक्ष नेमिनाथ
भगवानची अप्रतिम सुंदर मुर्ती आहे. महिन्याच्या प्रत्येक अमावस्याला येथे मासिक यात्रा महोत्सव व कालसर्प योग का विधान होतो.अशी माहिती विश्वस्त प्रदीप जीवराज मेहता व वैभव महावीर मेहता यांनी दिली.