परंडा (प्रतिनिधी) - परंडा आगारास 30 नविन बस, 30 वाहक, 30चालक व परंडा आगारातुन लांब पल्याच्या बस त्वरीत सुरू करण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस सामाजीक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहूल बनसोडे यांनी खासदर सुप्रिया सुळे यांच्या मार्फत शरदचंद्र पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शरद पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.परंडा आगार सुरु झाल्या पासून आगारातून लांब पल्ल्यासाठी बस चालु करण्याची सतत मागणी करुन अद्याप बस सुरु करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे येथील नागरिकांना कुर्डुवाडी अथवा बार्शीहून प्रवास करावा लागत आहे.यामुळे आगार सुरु होऊन हि जनतेची प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे.    

तसेच परंडा आगार सुरु होऊन 26 वर्षे झाली मात्र परंडा आगारास एकही नवीन बस अद्याप मिळाली नाही.परांडा तालुका व शेजारील ग्रामीण भागातील लोकसंख्येचे प्रमाण पाहता आणि सोनारी येथील श्री.काळभैरवनाथ देवस्थान दर्शनास येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता आगारात असणाऱ्या बसेस अपुऱ्या पडत असून जनतेच्या प्रवासाच्या सोयीसाठी अजून किमान तीस बसेस,तीस वाहक व तीस चालक यांची अत्यंत आवश्यकता आहे. बसेस,चालक,वाहक यांची उपलब्धता करुन देण्यात यावी.

तसेच परंडा-कराड परंडा- कुर्डुवाडी-पंढरपूर-कराड,परंडा- बोरीवली परंडा-करमाळा- भिगवन-पुणे-बोरीवली,परंडा- मुंबई परंडा-कुर्डुवाडी-पुणे-मुंबई

परंडा-कोल्हापूर परंडा- कुर्डुवाडी-पंढरपूर-सांगली-कोल्हापूर,बार्शी-वसई,बार्शी- परंडा-करमाळा-नगर-तुळजापूर- पालघर तुळजापूर-बार्शी-परंडा- करमाळा-नगर-आळेफाटा-वसई-पालघर,परंडा-कल्याण परंडा- करमाळा-भिगवन पुणे-कल्याण, परंडा ते पुणे व्हाया कुर्डुवाडी हि बस सेवा सुरु आहे तिला कायम स्वरूपी मान्यता मिळावी तसेच परंडा लातूर परांडा बार्शी धाराशिव-औसा मार्ग लातूर, परांडा-लातूर परांडा बार्शी येडशी मुरुड-लातूर,परांडा अकलुज, तुळजापूर-बार्शी-परांडा- करमाळा-अहमदनगर-जुन्ना या बस मार्गास मंजुरी देऊन तात्काळ प्रवाशाच्या प्रवास सेवेसाठी बससेवा सुरू करण्याच्या सुचना  संबंधीत विभागास द्याव्यात असे पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस सामाजीक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, आबासाहेब खोत,बिभिषण खुने, घनश्याम शिदे,महादेव लोकरे आदी उपस्थित होते.


 
Top