तुळजापूर (प्रतिनिधी)-विश्व हिंदू परिषदे तर्फ आयोध्येतील रामलल्लाच्या मूर्तीच्या स्थापनेचे निमंत्रण पञिका श्री तुळजाभवानी माते चरणी शुक्रवार दि. 5 जानेवारी रोजी महंत वाकोजीबुवा यांच्या हस्ते ठेवण्यात आली. त्यानंतर तिर्थक्षेञ तुळजापूर शहारातील महंताना उदघाटनाचे विशेष निमंत्रण पञिका देवुन देण्यात आले. शुक्रवार दुपारी विश्वहिंन्दू पदाधिकारीनी अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या वेळीची निमंञण पञिका देविचे महंत वाकोजीबुवा, गुरु तुकोजी बुवा यांच्या शुभहस्ते श्रीतुळजाभवानी चरणी ठेवण्यात आली. त्यानंतर यावेळी तिर्थक्षेञ तुळजापूर येथील महंताना ही निमंत्रण देवुन आमंत्रित करण्यात आले.
अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य श्रीराम मंदिरात दि. 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अयोध्या रामजन्मभूमी ट्रस्ट येथील श्री तुळजाभवानी मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेचे आमंत्रण विविध देवी उप देवतांना ही यावेळी देण्यात आले. या प्रसंगी विश्व हिंन्दू परिषदेचे जिल्हाध्यक्ष ॲड. गजानन चौगुले, विजय वाघमारे, छत्रपती संभाजीनगरचे संजय बारगजे, श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ अध्यक्ष सज्जनराव सांळुके, श्रीतुळजाभवानी प्रक्षाळ मंडळ अध्यक्ष विशाल रोचकरी सह पुजारी, भाविक मोठ्या संखेने उपस्थितीत होते.