धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनानिमत्ति धाराशिव येथे शनिवारी (दि.6) वृत्तपत्र सृष्टीचे जनक, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात शनिवारी स. 10 वा. हा कार्यक्रम होणार आहे. सोहळ्याचे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, ज़िप़ मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची उपस्थिती तर अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार श्री.जांभेकर यांच्या  प्रतिमेचे पूजन व मार्गदर्शन सोहळा होणार आहे.जिल्ह्यातील पत्रकारांनी या सोहळ्यास उपस्थित रहावे, असे  आवाहन पत्रकार संघाचे सरचिटणीस संतोष जाधव, सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य, कोषाध्यक्ष संतोष हंबीरे, उपाध्यक्ष श्रीकांत कदम, अब्बास सय्यद, तालुकाध्यक्ष सुभाष कदम (धाराशिव), अंबादास पोफळे (तुळजापूर), सुरेशकुमार घाडगे (परंडा), प्रमोद कांबळे (भूम), गौतम चेडे (वाशी), बालाजी वडजे (उमरगा), विलास मुळीक (कळंब), इक्बाल मुल्ला (लोहारा), जिल्हा संघटक मच्छिंद्र कदम, आकाश नरोटे,विनोद बाकले, सुधीर पवार, दीपक जाधव, प्रशांत कावरे, प्रा. सतीश मातने, मल्लीकार्जुन सोनवणे, कैलास चौधरी, उपेंद्र कटके, धनंजय पाडुळे, सुधीर पवार,संतोष शेटे, प्रविण पवार, राहुल कोरे, अजित माळी, अविनाश गायकवाड, सुरेश कदम, भागवत शिंदे, पार्श्वनाथ बाळापुरे, उन्मेष पाटील, शिवाजी बोबडे, शरद गायकवाड, श्रीनिवास भोसले, उमाजी गायकवाड, गुणवंत पवार, सल्लाउद्दीन शेख, निशिकांत क्षीरसागर, फैसल काझी, बालाजी लोखंडे,  उत्तम बनजगोळे, किशोर माळी, हरि खोटे, दीपक सावंत, आकाश पवार यांनी केले आहे.


 
Top