उमरगा (प्रतिनिधी)-ग्रंथातून चांगल्या संस्कारासह जाणीव, जागृती निर्माण होते. मनुष्याची वैचारीक क्षमता वाढते, समाज परिवर्तनासाठी पुस्तकांची भूमिका महत्वपूर्ण आहे. त्यासाठी वाचन संस्कृतीची चळवळ घराघरात पोहोचली पाहीजे, असे मत नाशिक येथील ‌‘आजीचं पुस्तकांचं हॉटेल” च्या संस्थापिका भीमाबाई जोंधळे यांनी व्यक्त केले.

प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृतीप्रित्यर्थ वाचनालयाच्या वतीने स्मृतीगौरव पुरस्कार सोहळा शनिवारी (दि.30) येथील ओमसाई मंगल कार्यालयात घेण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरवण्यात आले. यावेळी रोटरी उमरगाचे अध्यक्ष कमलाकर भोसले, काँग्रेसचे प्रदेश सचिव दिलीप भालेराव, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, शांताबाई चव्हाण, ॲड. अर्चना जाधव, प्रा. सुनीता चावला, आशुतोष महाराज, उद्योजक सिद्रामप्पा चिंचोळे, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, रामभाऊ गायकवाड उपस्थित होते. भीमाबाई जोंधळे म्हणाल्या की, वाचन संस्कृतीमुळे मानवी जीवनात वैचारीक बदल होतात. अनेक अडचणी, समस्या वाचनामुळेच दूर होतात. वाचन चळवळ व्यापक झाली तरच संस्कारक्षम समाज घडेल. प्रास्ताविक ॲड. शितल चव्हाण यांनी केले. यशस्वितेसाठी सत्यनारायण जाधव, राजू भालेराव, राजू बटगिरे, व्यंकट जाधव, मनोज मांडवे, ज्योती मंमाळे, किशोर जाधव, माधव चव्हाण, अनुराधा पाटील, धानय्या स्वामी, किशोर बसगुंडे, प्रदीप चौधरी, करीम शेख, शशीराज पाटील, विजय चितली, लेखा औटी, संतोष चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रविण स्वामी यांनी केले तर आभार ॲड. खाजा शेख यांनी मानले.


 
Top