धाराशिव (प्रतिनिधी)- हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यात भाई नरसिंहराव देशमुख काटीकर,भाई उद्धवराव पाटील यांचे योगदान भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत व महाराष्ट्राच्या जडणघडणीत श्रमजीवी, शेतकऱ्यांचे नेते, विरोधी पक्ष नेता, मुख्यमंत्री पदाची ऑफर नाकारणारे एकनिष्ठ भाई उद्धवराव पाटील यांचे कार्य लोकशाही उधवस्त करू पाहणाऱ्या आजच्या राजकारण्याना प्रेरणा देणारे आहे असे प्रमुख पाहुणे प्रा. रवी सुरवसे यांनी बोलताना सांगितले.

झुंजार सेनानी भाई उद्धवराव पाटील यांची 103 वी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात प्रा. रवी सुरवसे बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष व शिक्षण तज्ञ एम.डी देशमुख होते. यावेळी माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, जयसिंगराव देशमुख , राष्ट्रवादीचे नेते प्रतापसिंह पाटील, भाई माणिकराव बोधले, संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अविनाशराव देशमुख, सचिव भाई धनंजय पाटील, माजी न्यायमूर्ती संभाजीराव मुंडे, सुलभा पाटील - देशमुख, सरला पाटील, प्राचार्य पी. एन. पाटील, आदर्श प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याद्यापक कचरू घोडके, उपप्राचार्य एन. एम. देटे, पर्यवेक्षक एस.पी.मुंडे, पर्यवेक्षक व्ही. के. देशमुख, राष्ट्रवादीचे राज्य युवक प्रदेश सचिव आदित्य पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात भाई उद्धवराव पाटील विचार मंचच्या वतीने करण्यात आले होते.

शिक्षण दोन पातळीवर चालते एक औपचारिक आणि दुसरे अनौपचारिक पातळीवर, प्रत्येकानं आत्मशोध घेऊन आत्मचिंतन करावे. शाळेतून नव्या पिढीची निर्मिती होत असते. ओळखून सामाजिक स्वास्थ्यासाठी राजकारण करणारे भाई उद्धवराव पाटील होते असे एम. डी. देशमुख यांनी अध्यक्षिय भाषणात सांगितले.

प्रास्ताविक अमोल दिक्षित यांनी केले. सुत्र संचालन श्रीमती सुहासिनी जाधव व श्रीमती जोत्स्ना बनजगोळे यांनी केले. तर आभार प्राचार्य पी. एन. पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी पालक, उपस्थित होते.


भाई उद्धवराव पाटील यांच्या जयंती निमित्त निमित्त राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपत राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळ, भाई उद्धवराव पाटील विचार मंच व छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवन संघर्षावर आधारित 'सत्यशोधक चित्रपट ' प्रशालेतील विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला.


 
Top