परंडा (प्रतिनिधी) - सुरेश वायकर यांचा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री धाराशिव त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांनी आतापर्यंत 22 वर्ष शिक्षण क्षेत्रात सेवा केली असून, त्या सेवेत अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले. त्यामध्ये आतापर्यंत लोकवर्गणीतून ई-लर्निंग शाळा, गेट कंपाऊंड, प्रयोगशाळा, वर्ग खोली दुरुस्ती, साऊंड सिस्टीम, इन्व्हर्टर, संगणक, विद्यार्थी ओळखपत्र असे अनेक शैक्षणिक उपक्रम राबवून शाळेचा कायापालट केला. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिडा स्पर्धेत विभाग स्तरीय स्पर्धेत विद्यार्थी प्रवेश, स्कॉलरशीप मध्ये विद्यार्थी उत्तीर्ण, गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन शाळेच्या नावलौकिक वाढवला. या कामाची दखल घेऊन अनेक वेळा गावपातळीवर सत्कार करण्यात आला. तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच महालिंग राऊत, उपसरपंच शशिकांत खुणे,सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आसू शाळेच्या वतीने यथोचित सन्मान केला व सिद्धार्थ मिञ मंडळ आसू यांनी देखील कार्याची दखल घेऊन सन्मान केला. याप्रसंगी सीईओ राहुल गुप्ता, शिक्षणाधिकारी सुधा साळुंके, गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, शिवसेनाप्रमुख दत्ता साळुंके, मुख्याध्यापक सतिश गुरव, चेअरमन सानेगुरूजी शिक्षक सहकारी पतसंस्था, परंडा ज्ञानेश्वर देवराम, सुधीर वाघमारे, नितेश थिटे,भाग्यश्री पवार (वायकर), ढोरे, बागडे, केमदारणे मॅडम व ग्रामस्थ व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top