भूम (प्रतिनिधी)- गावा गावातली कॉग्रेस भूईसपाट झाली. तिचा पुन्हा उगम कधीच होणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांना यापुढे चांगले दिवस येतील. आगामी निवडणुकीत स्वत मोदी समजून योजना घरापर्यंत पोहोचवा असे आवाहन गाव चलो अभियानचे जिल्हा संयोजक ॲड. मिलिंद पाटिल यांनी भूम येथील बैठकित बोलताना केले. यावेळी योजनेचे माहिती पत्रक वितरित केले.

दि. 29 जानेवारी 2024 रोजी भूम येथील यश मंगल कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या प्रत्येक योजनेची माहिती घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी गावा गावात पोहोचण्यासाठी जिल्हा समन्वयक म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते आगामी लोकसभा निवडणुकीतील इच्छुक उमेदवार विधीज्ञ मिलिंद पाटील यांच्याकडे जिल्हा संयोजक म्हणून जबाबदारी दिली आहे. गांव चलो अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विशेष बैठक घेतली जात आहे . त्याच अनुषंगाने भूम येथे तालुक्यातील बैठक घेण्यात घेण्यात आली.

या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, गांव चलो अभियान जिल्हा संयोजकमिलिंद पाटील, परंडा भुम वाशी विधानसभा निवडणूक प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा सरचिटणीस इंद्रजित देवकते, प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रवीण पाठक, विधानसभा विस्तारक शिवाजी गिड्डे, पाटील,  भाजपा नेतेजालिंदर मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील, जिल्हा चिटणीसअंगद मुरूमकर, ता. अध्यक्षमहादेव वडेकर, ता. सरचिटणीस संतोष सुपेकर, बालाजी बांगर, तालुका उपाध्यक्ष विधीज्ञ अंगद चव्हाण,शिवाजी उगलमुगले, ता. युवा अध्यक्ष गणेश भोगील, तालुका प्रसिद्धीप्रमुख शंकर खामकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोहन जाधव, विकास जालन यांच्यासह तालुक्यातील शक्ती केंद्रप्रमुख, सुपर वॉरियर, बुथ प्रमुख यांची उपस्थिती होती.


 
Top