उमरगा (प्रतिनिधी)-उमरगा शहरातील श्री राम मंदिर येथे दि. 22 जानेवारी 2024 वार सोमवार रोजी श्री शिवाजिदादा मित्र मंडळ उमरगा व श्री राम मंदिर उत्सव समिती यांच्या वतीने अयोध्या येथे श्री राम मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त श्री राम मंदिर उमरगा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 8 वाजता श्री राम मूर्तीचे अभिषेक भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी.9 वाजता श्री रामाच्या 6 फूट उंचीच्या मूर्तीचे पूजन उमरगा भाजपा तालकाध्यक्ष शहाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. दुपारी 12 वाजून 29 सुमारास अयोध्या येथील महाआरती ज्यावेळी झाली त्याच वेळी उमरगा येथे श्री राम मंदिरात महाआरतीचे माजी जी. प. बांधकाम सभापती अभयराजे चालुक्य यांच्या हस्ते पूजाविधी करून करण्यात आली. या महाआरती वेळी उमरगाचे आमदार ज्ञानराज चौगुले, भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, तालुकाध्यक्ष शहाजी पाटिल, युवासेना नेते किरण गायकवाड, शिवसेना तालकाप्रमुख बळीराम सुरवसे, माजी नगराध्यक्ष हंसराज गायकवाड, माजी नगरसेवक अरूण ईगवे, भाजप युवामोर्चा तालुकाध्यक्ष उमेश स्वामी, विशू साळुंके, माजी नगरसेवक बळीराम पवार, अमोल तानवडे, विकास सूर्यवंशी,श्री राम राठोड,भाऊ तोरणेकर, राम कांबळे, बबलू औरादे, जिग्नेश पटेल,बबलू गायकवाड, आकाश गायकवाड, केदार शिरगुरे, नितीन स्वामी आदीसह रामभक्त माता, बघिणी, लहान मुले, तरुण वृद्ध भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंदीर परिसरात श्री रामाच्या पालखीचे मिरवणूक काढण्यात आली. मंदीर परिसरात हजारो दीप प्रज्वलित करण्यात आले. शेकडो महिला भक्तांनी रामरक्षा स्तोत्र पठण केले. यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण मंदीर परिसरात भगवे झेंडे व लायटिंग, अकाशदिप लावण्यात आले. अशा प्रकारे विविध कार्यक्रमाने हा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्री शिवजिदादा मित्र मंडळ, श्री राम मंदिर उत्सव समिती, व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.