धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यालयात गुरूवारी (दि .4) जिल्हा, तालुका व विविध सेलच्या कार्यकारणी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश  बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. तसेच आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकी संदर्भात उपस्थित पदाधिकारी यांना सुरेश दाजी बिराजदार यांनी मार्गदर्शन केले. धाराशिव  लोकसभेचा खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचा झाला पाहिजे यासाठी प्रत्येकाने आत्तापासून प्रयत्न करावा असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केले.

येणाऱ्या 13 जानेवारी ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्या दिवशी कार्यकर्ता मेळावा होणार असून याच्या नियोजनार्थ जिल्हाध्यक्ष यांनी कार्यकर्ते यांना सूचना दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा तालुका व विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार व जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. या नियुक्तीमध्ये जिल्हा सचिव पदी फिरोज पठाण, जिल्हा सहसचिव पदी हेमंत माळवदकर, जिल्हा उपाध्यक्ष पदी पंकज स्वामी,अण्णासाहेब आलूरे,बाबा छोटू मिया शेख, धाराशिव किसान सभा सेल जिल्हाध्यक्ष पदी प्रकाश बावणे, सोशल मीडिया (कळंब-भूम -परंडा -वाशी) जिल्हाध्यक्ष पदी उदयचंद्र खंडागळे,सेवादल सेल जिल्हाध्यक्ष पदी सतीश घोडेराव,बंजारा सेल जिल्हा उपाध्यक्ष पदी नामदेव राठोड,कळंब तालुका उपाध्यक्ष पदी आगतराव कापसे, नळदुर्ग शहराध्यक्ष पदी अब्दुल रहेमान जुनैद,धाराशिव शहर सचिव पदी सुजित बारकुल,वाशी तालुका सरचिटणीस पदी अशोक गुंजाळ,वाशी तालुका उपाध्यक्ष पदी अतुल चौधरी, धाराशिव कळंब विधानसभा कार्याध्यक्ष पदी गणेश भोसले, भूम तालुका सहसचिव पदी दत्ता काळे,तालुका उपाध्यक्ष पदी सुधीर मगर,तुळजापूर तालुका कार्याध्यक्ष पदी बसवन्नाप्पा मसुते, वाशी तालुका कार्याध्यक्ष पदी राहुल शिंदे, धाराशिव शहर सहसचिव पदी शहजाद काझी,भूम तालुका कार्याध्यक्ष पदी धनाजी वडेकर,तुळजापूर तालुका सचिव पदी बबलू शेख, सामाजिक न्याय धाराशिव महिला शहराध्यक्ष पदी भाग्यश्री माळाळे,सामाजिक न्याय जिल्हा कार्याध्यक्ष पदी दिलीप जाधव, सामाजिक न्याय जिल्हा कोषाध्यक्ष पदी समाधान रोकडे,सामाजिक न्याय परंडा तालुकाध्यक्ष पदी विक्रम जाधव,कोंड जि.प.गट प्रमुख पदी लक्ष्मण गायकवाड,तेर जि.प.गटप्रमुख पदी नजीब मासूलदार,धाराशिव तालुका उपाध्यक्ष नितीन चव्हाण,विराट पाटील,ओ.बी.सी सेल जिल्हा सचिव पदी नारायण तुरुप,विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष पदी मयूर दराडे,विद्यार्थी जिल्हा सरचिटणीस पदी मुर्तूज मुलानी,विद्यार्थी जिल्हा संघटक पदी आदित्य शेटे,धाराशिव विद्यार्थी तालुका कार्याध्यक्ष पदी गणेश गुरव,तुळजापूर विद्यार्थी शहराध्यक्ष पदी संकेत गाजरे,तुळजापूर विद्यार्थी शहर उपाध्यक्ष पदी आदित्य सोनटक्के,धाराशिव विद्यार्थी तालुकाध्यक्ष पदी सागर गाढवे, तुळजापूर विद्यार्थी तालुकाध्यक्ष पदी सोहेल बागवान, धाराशिव विद्यार्थी सहसचिव पदी शहेजाद काजी यांच्या निवडी करण्यात आल्या.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार,जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे, ज्येष्ठ नेते भास्कर दादा खोसे गोकुळ शिंदे, शफी शेख,प्रवीण यादव, मराठवाडा पदवीधर प्रदेश कार्याध्यक्ष नितीन बागल, भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप धाराशिव कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे, युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे, धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे, परंडा शहराध्यक्ष जावेद पठाण, शिवाजीराव लकडे, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, वाशी तालुकाध्यक्ष ॲड.सूर्यकांत सांडसे, धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, भूम तालुकाध्यक्ष ॲड.रामराजे साळुंखे, परंडा तालुकाध्यक्ष अमोल काळे, धाराशिव युवक तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे, कळंब युवक तालुकाध्यक्ष अमर मडके, तुळजापूर युवक तालुकाध्यक्ष नितीन रोचकरी, तुळजापूर युवक तालुका कार्याध्यक्ष समाधान ढोले, परंडा अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जहांगीर शेख, मलंग शेख सामाजिक न्याय धाराशिव शहराध्यक्ष विक्रम कांबळे, अल्पसंख्यांक माजी जिल्हाध्यक्ष असदखान पठाण, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सुहासराव मेटे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने, लिंबराज लोखंडे, सुरेश राठोड, समीर काझी, अरफात काझी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top