धाराशिव (प्रतिनिधी) - आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती व दर्पण दिनानिमित्त व्हाईस ऑफ मीडियाच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार व अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते दि.6 जानेवारी रोजी सत्कार करण्यात येणार आहे. 

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व दर्पण दिनानिमित्त व्हाईस ऑफ मीडियाच्यावतीने राज्यभरात विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. तर धाराशिव शाखेच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल पाटील भंडारवाडीकर, महादेव नरोटे व गणेश शिंदे, डायटचे माजी प्राचार्य डॉ कलीम शेख, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक शोभा कुलकर्णी, नायब तहसिलदार प्रियंका लोखंडे, आनंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सुनील प्लाझा येथील दैनिक प्रजापत्र कार्यालयात सकाळी 11.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास  सर्व पत्रकार व जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन व्हाईस ऑफ मीडियाचे महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन सोनवणे, धाराशिव तालुकाध्यक्ष अमजद सय्यद, साप्ताहिक विंग जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते, डिजिटल विंग जिल्हाध्यक्ष वैभव पारवे, उपाध्यक्ष सलीम पठाण, जिल्हा कार्यवाहक कुंदन शिंदे, शिक्षण विंग जिल्हाध्यक्ष शीतल वाघमारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी किशोर माळी, आकाश नरोटे, असिफ मुलानी, किरण कांबळे, कार्यवाह विशाल जगदाळे, प्रवक्ता विश्वनाथ जगदाळे, प्रशांत सोनटक्के, प्रशांत मते, अमोल गायकवाड, सचिन वाघमारे, प्रमोद राऊत, अरुण गंगावणे, सुमेध वाघमारे यांनी केले आहे.


 
Top