तुळजापूर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे देशात सुपरवॉरिअर मोठ्या प्रमाणात पक्षाचे एकनिष्ठते काम करीत आहेत. हे सुपरवॉरिअरच भारतीय जनता पार्टीला निवडणुकीमध्ये यश मिळवून देणारा सुपरहिरो असल्याचे प्रतिपादन भाजपचे नेते व प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे यांनी केले.

भारतीय जनता पार्टी कार्यालय तुळजापूर बुधवार 3 जानेवारी रोजी सुपरवॉरिअर यांची  बैठक पार पडली.यावेळी ॲड. अनिल काळे बोलत होते. यावेळी

भाजपा नेते नेताजी पाटील, साहेबराव घुगे, दीपक आलुरे, राजसिंह राजेनिंबाळकर,आनंद कंदले, विक्रम (मालक) देशमुख, राजकुमार पाटील, प्रभाकर मुळे, विजय शिंगाडे, शांताराम पेंदे यांच्या सह सर्व सुपरवॉरिअर उपस्थित होते. यावेळी भाजपा नेते  आमदार  राणाजगजितसिंह पाटील  यांनीही ऑनलाईन सवांद साधला. या बैठकीमध्ये महाविजय 2024 सुपरवॉरिअर मराठवाडा विभागीय सहसमनव्यक पदी निवड झाली म्हणून तालुक्याच्या वतीने त्यांचा सत्कार केला.

पुढे बोलताना  ॲड. अनिल काळे  म्हणाले की,  प्रत्येक विधानसभा मतदार संघातील 100  सुपरवॉरिअर हे पुढील 15 वर्षाचे नेतृत्व असणार आहे. त्यामुळे चांगले काम केल्यास  याच सुपरवॉरिअर मधून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, आमदार खासदार होणार आहेत. सुपरवॉरिअर यांनी गावात जाऊन बुथवर 100 ते 150 कार्यकर्त्याची बैठक घ्यावी.  त्या बूथ प्रमुखाला मान सन्मान देऊन त्याचा जाहीर सत्कार करावा.  त्या बूथ मध्ये 51 टक्के मतदान भाजप उमेदवाराला झाले पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान म्हणून मा.नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करावयाचे आहे . मा.ना देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करायचे आहे . आ राणाजगजितसिंह पाटील यांना 50000 हजार मताधिक्याने निवडून आणायचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तुळजापूर तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी तालुकाध्यक्ष संतोष बोबडे यांनी आभार मानले.


 
Top